Friday, July 10, 2020

अंबाजोगाईत बियाणे उगवले नाही म्हणुन रेणुका सिड्स वर गुन्हा दाखल .


अंबाजागाई;(प्रतिनीधी )अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड केली आहे. यातील बहुतांशी शेतकर्‍यांनी रेणुका सिडस् प्रा. लि. लातूर यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन बियाणे वापरले आहेत. परंतु हे बियाणे उगवले नसलयाची तक्रार शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी गणेश शंकर श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून रेणुका सिडस्वर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होते. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षीही शेतकर्‍यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. बहुतांशी शेतकर्‍यांनी रेणुका सिडस् प्रा.लि. लातूर या कंपनीने उत्पादीत केलेले सोयाबीन बियाणे वापरले मात्र ते शेतात उगवले नाही. याबाबतची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाने अनेक शेतकर्‍यांच्या शेतात जावून पंचनामे केले. तालुका कृषी अधिकार्‍यांकडे पन्नासपेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्यानंतर या भागात रेणुका सिडस् बियाणे ज्या शेतकर्‍यांनी पेरले आहे त्या शेतकर्‍यांच्या शेतात जावून पंचनामे केले असता सदरचे बियाणे हे उगवले नसल्याचे दिसून आल्यानंतर तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून रेणुका सिडस् यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलिसात भा.दं.वि. कलम ४२० सह बियाणे अधिनियम १९६६ चे कलम ६ (बी) व ७ (बी) बियाणे नियम १९६८ चे कलम २३ (ए)/(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment