Friday, July 10, 2020

एसबीआय बँकेशी संपर्क आलेल्या दीड हजार लोकांची दोन दिवसात स्वॅब तपासणी.

* आरोग्य विभागाचे 25 जणांचे पथक.आज शहर तर उद्या ग्रामीण भागातील तपासणी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे पाच कर्मचारी दि.04 जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळुन आल्यानंतर एसबीआय च्या संपर्कात आलेल्या व कर्मचार्‍यांचे कुटुंबिय पॉझिटिव्ह निघत आहेत. समुह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर त्यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक,तहसिलदार विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांनी आज दि.10 रोजी एसबीआय बॅंकेशी संपर्कात आलेल्या 1500 जणांच्या स्वॅब तपासणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे चार बुथ उभारली असुन दोन दिवसात या सर्वांचे स्वॅब पाठविण्यात येणार आहेत.
परळी शहरातील टॉवर चौकातील एसबीआय बँकेचे कर्मचारी दि.04 जुलै रोजी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर मागील सात दिवसापासुन कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. बँकेतील कर्मचार्‍या व्यतिरिक्त संपर्कात आलेले काहीजण पॉझिटिव्ह निघाल्याने समुह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने दि.25 जुन पासुन ते 04 जुलै पर्यंत एसबीआय बँकेत येऊन व्यवहार केलेल्या लोकांची यादी करण्यात आली आहे. या सर्वांना होम क्वारंटाईनच्या सुचना प्रशासनाने दिल्या होत्या. या सर्वांचे स्वॅब घेण्यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत परळीतील महसुल व आरोग्य विभागातील अधिकार्यांची बैठक झाली. यात शहरातील 816 व ग्रामिण भागतील 495 जणांचा समावेश असून या व्यतिरिक्त कर्मचार्‍यांचे कुटुंबिय व इतर अशा 1500 लोकांचे स्वॅब घेऊन आज दि.10 व 11 जुलै या दोन दिवसात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तिगृहात चार बुथ उभारण्यात आले आहेत. यात प्रत्येक बुथ मध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एका मदतनिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ.दत्तात्रय केंद्रे, डॉ.संतोष गुंजकर, डॉ.व्यकंटेश तिडके यांची नियु्नती करण्यात आली असून आज दि.10 जुलै रोजी परळी शहरातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. न.प.मुख्याधिकारी डॉ.अरविंंद मुंडे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे हे न.प.च्या माध्यमातून एसबीआय बँकेच्या संपर्कात आलेल्या शहरातील नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम करत आहेत. तर ग्रामिण भागातील 495 व्य्नतीचे स्वॅब घेण्यासाठी पंचायत समितीचे गटविकासअधिकारी संजय केंद्रे हे ग्रामसेवक आणि कर्मचार्‍यांच्या मार्फत ग्रामिण भागातील नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी तयारी करत आहेत. 
******--------******
बॅंकेशी संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी-डॉ.दिनेश कुरमे
एसबीआय बॅंकेशी दि.25 जुन ते 4 जुलै दरम्यान व्यवहार केलेल्या 1311 जणांची नावे निष्पन्न झाले असुन या व्यतिरिक्त या बॅंकेशी संपर्कात आलेल्या इतर सर्वांची नाव निश्चीती करण्यात येत असुन या सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.ज्या नागरीकांना कोरोना लक्षणे दिसत असतील संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांनी केले आहे.
********-----*******
एसबीआय संपर्कातील सर्वांनी होम कॉरंन्टाईन व्हावे- डॉ.अरविंद मुंडे
परळीच्या एसबीआय बॅंकेशी व्यवहार केलेल्या शहरातील नागरीकांची यादी बॅंकेकडुन आलेली आहे त्यानुसार त्या नागरीकांना होम कॉरंन्टाईन करण्यात आले आहे.या व्यतिरिक्त बॅंकेशी संपर्कात आलेल्या नागरीकांनी होम कॉरंन्टाईन व्हावे व तपासणी आणी माहिती घेण्यासाठी आलेल्या कर्मचार्यास सहकार्य करुन कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन न.प.मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment