पालकमंत्री धनंजय मुंडेंमुळे जिल्हयातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू.
बीड (दि.०२) —- : बीड जिल्ह्यातील दोन महत्वाच्या रिक्त पदांवर राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड व अंबेजोगाई ही दोन अपर जिल्हाधिकारी पदे गेली अनेक दिवस रिक्त होते. याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा केला होता.
बीड जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार केवळ ५२% अधिकाऱ्यांमार्फत सुरू असून येत्या ६ महिन्याच्या कालावधीत ही संख्या वाढवून 65 %च्या वर नेऊ असे आश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून घेतलेल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व विभागांचा आढावा घेऊन संबंधित विभागांकडे रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे
No comments:
Post a Comment