परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कल्याणकारी हनुमान मंदिर येथे दि 15 ते 19 एप्रिल या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत सकाळी 10 ते 1 परमरहस्य पारायण ,दुपारी 1ते 3 महाप्रसाद व दुपारी 4 ते 6
कल्याणकारी महिला भजनी मंडळ, इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ, माणिक नगर महिला भजनी मंडळ ,बसवेश्वर महिला भजनी मंडळ,जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ,सेवाभावी शंभू महादेव महिला भजनी मंडळ ,वैद्यनाथ महिला भजनी मंडळ,गुरुलिंगस्वामी महिला भजनी मंडळ,सुर्वेश्वर सेवाभावी महिला भजनी मंडळ ,शंभू महादेव महिला भजनी मंडळ,शिवकन्या महिला भजनी मंडळ,शनेश्वर महिला भजनी मंडळ या विविध महिला भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता आज दि 19 रोजी होणार असून त्यानिमित्ताने दुपारी 12वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर 1 ते 3 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता भव्य अशी शोभायात्रा निघणार असून त्याचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे कल्याणकारी हनुमान मंदिरापासून निघून माणिक नगर हनुमान चौक ती छत्रपती शिवाजी महाराज चौक , नाथ चित्र मंदिर हिंगलाज माता चौक (दोस्ती टी हाऊस )ते वडर कॉलनी परळी मार्गे परत कल्याणकारी हनुमान मंदिराकडे येणार आहे या शोभा यात्रेत सोलापूर येथील प्रसिद्ध कलापथक *वीरभद्र पुरवंत संघ* सहभागी होणार असून यात विविध महिला भजनी मंडळ व महिलांच्या पावलांचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी सर्व वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तरी सर्व समाज बांधवांनी जन्मोत्सव,महाप्रसाद व शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन वीरशैव लिंगायत समाज न्यू माणिकनगर परळी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment