Thursday, July 10, 2025

बजरंग बली वेताळ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील बारा ज्योतिर्लिंगाच्या नजीक असलेले श्री वेताळ मंदिर येथे आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 
आज गुरुवारी श्री वेताळ मंदिर येथे गुरुपौर्णिमा निमित्त श्री विलासानंद महाराज यांच्या हस्ते गुरुप्रतिमा, पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन  गायीले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वेताळ मंदिर सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.   
मंदिरांत  भाविकांची दिवसभर वर्दळ होती. मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  भाविकांनी   सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी महाप्रसादाने गुरुपौर्णिमा उत्साहाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment