बीड (प्रतिनिधी) बीड येथे साहित्यरत्न डाॅ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड ने आयोजीत केलेल्या गौरव महोत्सवात दि. 28-7-025 रोजी सायंकाळी आण्णाभाऊ साठे सभागृह मैदान चांदणे वाडा पेठ बीड येथे श्रीमती प्रेमलताताई चांदणे ज्येष्ठ मा. सभापती तथा नगरसेविका, नगर परिषद बीड. यांच्या माध्यमातून परिसरातील महीलांना कल्पतरूच्या सचिव डाॅ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते तर मा. सभापती तथा नगरसेविका सौ. जयश्रीताई विलास विधाते यांच्य प्रमुख उपस्थितीत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यारत्न आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मा. आशोक बप्पा सोनवणे, जयंती उत्सव समिती सचिव पोपटजी मिसाळ, सचिव सुनिलजी पाटोळे, सुधाकरजी धुरंधरे, केशवजी लोंढे, प्रविण थोरात यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा प्रेमलताताई चांदणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि उपस्थितीतांचे स्वागत करत कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डाॅ. सारीकाताई क्षीरसागर यांनी उपस्थित महिला भगीनींना संबोधित करत असताना दुखः दारिद्र्याशी झुंजत संसाराचा गाढा हाकत असताना जपलेला करारी बाण्या बद्दल महिला भगिनींच्या पाठीवर शब्बाशकीची थाप दिली. तर आपल्या शुभेच्छापर भाषणात जयश्रीताई विधाते यांनी स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे यांनी दाखवून दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अतुलनीय योगदानाबद्दल डिपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे आणि प्रेमलताताई चांदणे यांचे अभिनंदन करत समाजीक परिवर्तनाच्या लढ्यात आपणही त्यांच्या सोबत असल्याचे नमुद केले. महापुरुषांच्या विचारांची गावकुसा बाहेरील उपेक्षित वंचित दीन दुबळ्या भगीनींना जेव्हढी गरज आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त पांढरपेशा समाज व्यवस्थेतील गगनचुंबी झमारतीत. बंगल्यात, वाड्यात आणि राजवाड्यात राहाणाऱ्या भगीनींना जास्त आहे. कारण कालही स्त्रीची गणना शुद्रादी शुद्र म्हणून केली जायची आणि आजही पाहिजे तेव्हढा बदल झाला नाही या बद्दल खंत व्यक्त केली.
अजिंक्य भैय्या चांदणे यांनी आपल्या उपेक्षित वंचीत दीन दुबळ्या समाज बांधवांचे दुःख आणि दारिद्र्य मांडत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे नमुद केले.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लोणके सर यांनी केले. या कार्यक्रमात पाचशे भगींनींना मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील भगीनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment