Monday, March 3, 2025

MCC क्रिकेट क्लब च्या माध्यमातून खेळाडूंना चांगली संधी मिळवून देणार ;- अभिजीत सांगळे

वसई (प्रतिनिधी)MCC क्रिकेट क्लब, आगाशी गेल्या ५ वर्षापासून विविध उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरले आहेत ज्यामध्ये प्रामूख्याने लेडीज क्रिकेट स्पर्धा, वसई तालुका क्रिकेट स्पर्धा, वृक्षारोपण, वसई तालुक्यातील सौंदर्य म्हणजे तेथील समुद्र किनारा त्याचे साफसफाई करणे व २०२४ च्या दिवाळी मध्ये भरवण्यात आलेल्या “दिल की नजर से” असा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. MCC क्रिकेट क्लब, आगाशी हे बहुतांश सामाजिक कार्य करण्यात नेहमीच आघाडीवर असतात त्यामध्ये MCC क्रिकेट क्लब, आगाशी आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक २८ फेब्रृवारी व १, २ मार्च २०२५ या तीन दिवसांसाठी आगाशी पूरापाडा ग्राउंड वर भरवण्यात आले आहे या स्पर्धेच्या आयोजना निमित्त प्रमूख पाहुणे म्हणून राजेश प्रभाकर राऊत जेष्ठ पत्रकार, ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन व मानवतां फाउंडेशन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, वसई विरार शहर महानगरपालिका माजी नगरसेविका रंजना थालेकर, परिवहन सदस्य स्वप्निल कवळी, वसई तालुका प्रमुख शिवसेना सुदेश प्रभाकर चौधरी, संदीप वर्तक, सुबोध पिंगळे, धिरज वर्तक, सचिन कवळी असे मान्यवर उपस्थित होते. MCC क्रिकेट क्लब ने आयोजन केलेल्या स्पधैची रूपरेषा एक गाव एक संघ, ओपन संघ तसेच वाडवळ समाज संघ अशी असून पारितोषीकांची रूपरेशा प्रथम पारितोषिक ७७,७७७/- व चषक, दुसरे पारितोषिक ५५,५५५/- व चषक, तिसरे पारितोषिक ३३,३३३/- व चषक अशी आहे. 
वसई तालुक्यांतील बहुतांश गावाने आपापले संघ इथे नोंदवले आहे. खेळाडूचा ऊत्साह पाहता १ ल्या सामन्यांची सुरूवात करताना ग्राउंड वर नारळ फोडण्याचा तसेच टॅास उडवून सामना सूरू करण्याचा मान हा राजेश राऊत व अभिजीत सांगळे या मान्यवरांनी करून सामन्यास सुरूवात केली. 
वसई तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना पुढे चांगली संधी मिळावी त्यांनी पूढे MCA, रंजी ट्रॉफी, IPL सारख्या मोठ्या क्लब मध्ये खेळावे व त्यांनी वसई तालूक्याचे नाव भारतात पुढे न्यावे असे प्रतिपादन ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केले.
तसेच सर्व खेळाडूंनी सतत सराव करून आपली शरीर यष्टी सूखरूप ठेवावी असा मोलाचा सल्ला पत्रकार राजेश राऊत यांनी दिला. 
MCC क्रिकेट क्लब या क्लब च्या स्वयंसेवकांनी सर्व वसई तालूका खेळाडूंना पूढे चांगली संधी मिळावी म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले. या सामन्यांची सूरूवात झाली असून अंतीम सामना हा ३ मार्च ला सायंकाळी ४ वाजता ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मान्यवर अभिजीत दिलीप सांगळे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येतील.

No comments:

Post a Comment