परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त परळीतील बाजारपेठ रंगीबेरंगी सजली असून, विशेषतः रंगपंचमीसाठी लहानग्यांची खरेदीची लगबग वाढली आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्यांसह नैसर्गिक रंगांची मागणी वाढली आहे. विशेषतः कार्टून थीमवरील पिचकार्यांना लहानग्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी मुले आधीच पाण्याच्या पिशव्यांचा मारा करताना, तसेच पिचकार्यांमधून पाणी उडवत धमाल करताना दिसत आहेत.
यंदा बाजारात रंग आणि पिचकार्यांचे दर सुमारे 10 टक्क्यांनी वाढले असल्याचे विक्रेते सचिन पाचनकर यांनी सांगितले. तरीही रंगपंचमीप्रेमींकडून नैसर्गिक रंगांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून, सणासाठी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
No comments:
Post a Comment