Friday, January 6, 2023

कोष्टी समाज परळीच्या वतीने आयोजित श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता भाविकांची लक्षणिय उपस्थिती.

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याची आज शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी ज्ञानोबा, तुकारामच्या जय घोषात भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली.दि.30 डिसेंबर पासून सात दिवस चाललेल्या विविध धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभली.
परळीतील गुरूकृपानगर येथील श्री हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे दि.30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान  आयोजन करण्यात आले होतेे. आज सकाळी 11 वा
परळी शहराच्या विविध मार्गावरून श्री चौंडेशवरी देवीच्या प्रतिमेची सवादय शोभायात्रा काढण्यात आली. 
यात भाविक भक्त मोठया संखयेने सहभागी झाले होते. टाळ, मृदंगासह ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात ही शोभायात्रा निघाली. महिला भाविकांनी यावेळी फुगडया खेळून आनंद साजरा केला. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण संपन झाले. पारायणप्रमुख सौ.लताताई येळाये यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून हा पारायण सोहळा संपन्न झाला. दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  हरीपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी कोष्टी समाजातील महिला, पुरूष परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment