बीड (प्रतिनिधी) भारतातील व आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त आज बीड येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स समोरील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून व पुष्प वाहून काँग्रेसचे शहर अध्यक्ष परवेज कुरेशी ,उपाध्यक्ष मिलिंद मस्के,अमजद कुरेशी व समाजसेवक देविदास जंगले व शहर पदाधिकारी यांनी अभिवदन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज आज प्रत्येक समाजाला आहे.स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन या समाजातील महिलांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा विसर या समाजातील स्त्रि,व पुरुषांना पडता कामा नये असे उद्गार काँग्रेसचे शहराध्यक्ष परवेश कुरेशी यांनी केले.या कार्यक्रमास बीड शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment