केज तालुक्यातील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली परिसरातील सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवात ही कीर्तन सेवा सादर करण्याचा आग्रह भाविकांनी केला होता. परंतु सांगली येथील रामकथा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपली. त्यानंतर खाजगी वाहनाने 247 किमी अंतरावर वाघोली येथे जाण्यासाठी 5 तास 17 मिनिटे लागणार असल्यामुळे वेळेवर येणे होणार नसल्याचा निरोपही महाराजांनी संयोजकांना दिला होता. परंतु वाघोली, पुणे येथील कीर्तन महोत्सवाचे आयोजक संताराम कटके व मित्र परिवार भाविकांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आणि सांगली ते वाघोली हे अंतर अवघ्या 45 मिनिटात महाराजांनी पार केले. हेलिकॉप्टर मधून उतरताच महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.
भाविकांचा पुढाकार
हभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनचा लाभ भाविकांना मिळावा यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजक शांताराम खटके, व हरिदास जोगदंड, रोहीदास कटके, सोमनाथ कटके, सोमनाथ गावडे , गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेतला.
हत्तीवरून मिरवणूक
समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आले.
No comments:
Post a Comment