1 डिसेंबर रोजी किरकोळ डिजिटल रुपयासाठीचा (e₹-R) पहिला टप्पा लाँच करण्यात येणार आहे. लाँच करण्यात येणारा हा रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा वापर करणाऱ्या व्यक्ती मोबाईल फोन किंवा उपकरणांमध्ये साठवलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रुपयांद्वारे व्यवहार करू शकणार आहेत.
No comments:
Post a Comment