*आता प्रशासन तळेगाव-चाकण-शिक्रापूर रोडचे काम मार्गी लावण्याची तत्परता दाखवणार का?
चाकण (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या लगत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस काढून रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर नारिकांनी तत्परता दाखवून स्वतःच अतिक्रमन काढण्यास सुरुवात केली आहे. पण फक्त अतिक्रमण काढून या रस्त्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल का? असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

आम्ही शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे ते कधीना कधी निघणारच आहे. पण, हे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचा जो मागील १० वर्षांपासूनचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे तो सुटेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

तर या उलट काही नागरिकांनी याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमने करून करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. काहींनी त्यावर व्यावसायिक गाळे काढून मोठ्या प्रमाणावर आर्थिक माया जमवली आहे. ते तर अजूनही अतिक्रमने काढण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जशी या अतिक्रमण केलेल्या जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत अशा अविर्भावात काही स्थानिक नागरिक आल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. तर काही इथून मागे ही जागा माझीच त्याचा माझ्याकडे उतारा असल्याचे गावभर सांगत फिरत होते. पण, या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसा आल्याने असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे लोक तोंड पाडून फिरत आहेत.
त्यामुळे कुठेतरी आज पर्यंत तुम्ही शासनाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करून मोठा आर्थिक लाभ घेतला आहे. यातील काही नागरिकांनी शासनाची जागा मोकळी करून देण्यास तत्परता दाखवली तशी उर्वरित नागरिकही तत्परता दाखवतील यात शंका नाही. पण अतिक्रमण काढून या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे का? हे मात्र अनुत्तरीतच राहील.
No comments:
Post a Comment