मुंबई :- (प्रतिनिधी) देशाच्या राज्यघटनेने समान नागरी कायदा लागू करण्याबाबतची जबाबदारी राज्यांना दिली असून, महाराष्ट्रात'ही समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे सूचक संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक राज्याला कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागेल,असं विधान देखील त्यांनी यावेळी केले आहे.
तर फडणवीसांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायद्या लागू होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत; समान नागरी कायदा लागू करण्याबाबत हे विधान केलं आहे.
No comments:
Post a Comment