मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने केवळ ७ दिवसात ७८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी दिवसरात्र पाठपुरावा करून कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कच्या आधारे राज्यातील ७८६७ नादुरुस्त रोहित्रे बदलण्याचे काम पूर्ण केले.
No comments:
Post a Comment