केज तालुक्यातील लव्हुरी माहेर असलेल्या मीरा आकाश इंगळे (वय 28) या महिलेचा विवाह 8 सप्टेंबर 2019 ला आकाश अंतराम इंगळे (रा. वाघाळा कारखाना विटभट्टी, अंबाजोगाई) याच्याशी आळंदी येथे झाला होता. प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्नाच्या जाळ्यात ओढले. लग्नानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या.
नातेवाईकांकडून दुसरे लग्न लावायचा तगादा
दरम्यान पीडितेच्या पतीच्या नातेवाईकांनी आकाश याला सोडून दे, त्याचे दुसरे लग्न करून द्यायचे; असे म्हणत धमक्या देत होते. त्यानंतर पतीने ही तुला मुली झाल्या, त्या मुलीही माझ्या नाहीत असे म्हणत शारिरीक व मानसिक छळ करतं हाकलून दिले. दरम्यान याप्रकरणी पिढीतेच्या तक्रारीवरून पतीसह आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment