बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अनेक खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद ग्रामपंचायत निवडणुक कामासाठी नियुक्त केला आहे. अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे.वास्तविक पाहता ह्या शिक्षण संस्था राजकीय पक्षांनी संबंधीत असुन जिल्ह्याचे खासदार आमदार,माजी आमदार व पक्षाच्या नेते पदाधिकारी या संस्थेचे सभासद आहेत.असे असतांना या शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी देणे आम्हाला योग्य वाटत नाही ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज पारदर्शक होण्याच्या दृष्टीने एखाद्या विशिष्ट पक्षाच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची जबाबदारी देऊ नये अशी आमची मागणी आहे.
कृपया सदरील खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामाचे आदेश त्वरीत रद्द करण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment