Monday, December 5, 2022

अप्पारावांच्या मरणोपरांत घरकुलाचा प्रश्न मार्गी. वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेने मागण्या मान्य.

बीड (प्रतिनिधी) अप्पाराव पवार यांना शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजूर झालेले असताना वासनवाडी ग्रामपंचायत तसा पीटीआर दिलेला होता. जवळपास तीस ते पस्तीस वर्ष पवार यांना घरासाठी अविरत संघर्ष करावा लागला. वेळोवेळी प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून पवार कुटुंब यांचे उपोषण चिरडण्याचा प्रयत्न झाला. उपोषणा दरात दरम्यान अप्पाराव पवार यांच्या मुलीचेही प्रसूती उपोषण स्थळी झाली.तेव्हा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत प्रशासनातर्फे करण्यात आली नाही.बाळाच बाळाची नाळ काचेने कापली तरीही निर्दयी प्रशासनाने पवारांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.
 याच मागणी त्यांचा नातवाचाही डेंगू सारख्या आजारानं घात केला. अशा प्रचंड दुःखाच्या ओझ्याखाली अप्पाराव घरकुलाचा लढा लढत होते. अशातच 4 डिसेंबर रविवार रोजी सकाळी पहाटे पाच वाजता कडाक्याच्या थंडीने गारठून अप्पाराव पवार यांचा करून अंत झाला. प्रशासनाच्या नाकर्तेपणा व अनास्थेचा बळी ठरलेले अपरावांना न्याय  मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले.
जोपर्यंत घरकुल बांधून देणार नाहीत अप्पाराव पवारांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही.तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी अशी भूमिका वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी घेतली. तर जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांनी जिल्हाधिकारी यांना धारेवर धरून आप्पाराव पाटलांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा व पवार कुटुंबीयांचे मंजूर घरकुल तात्काळ निकाली काढा असा पवित्रा घेतला. या आंदोलनास विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,विविध पक्षांचे नेते पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड , पुरुषोत्तम वीर,अनुरथ वीर, पुष्पाताईत तुरुकमारे,जिल्हाध्यक्षा महिला, अनिता चक्रे, दगडू दादा गायकवाड, बबनराव वडमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे, अजय सरवदे , बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे शहराध्यक्ष लखन काका जोगदंड, लखन मगर, राजेंद्र कोरडे, मिलिंद सरपते , सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment