बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रात सध्या महापुरूषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून त्यांची बदनामी करण्याची स्पर्धा लागली आहे. यात संवैधानिक पदावर बसलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आघाडीवर आहेत. तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रीवेदी यांनी तमाम शिवप्रेमींची मने दुखावणारे वक्तव्य केले आहे. अशा ‘महाराष्ट्र द्रोह्यांना हटवा, महाराष्ट्र वाचवा,’ निषेध आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज गुरूवारी (दि.7) सुर्या लॉन्स कॅनॉल रोड येथे सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्वपक्षीय शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राची अस्मीता आणि आठरा पगड जाती- धर्मातील लोकांचे दैवत आहेत. अशा दैवताचा वारंवार अवमान केला जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मने दुखावली आहेत. विशेष म्हणजे कोशारी सारख्या संवैधानिक पदावरील व्यक्तीने महाराष्ट्रातील ईतरही महापुरूषांचा अवमान केलेला आहे. अशा महाराष्ट्र आणि महापुरूष द्रोह्यांना संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. अशा बेताल बोलघेवड्यांना धडा शिकवण्यासाठी शिवप्रेमींची अस्मीता दाखवून देणे गरजेचे आहे. आंदोलन छेडून जाब विचारल्याशिवाय महाराष्ट्र द्रोह्यांना अद्दल घडणार नाही. यामुळेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रीवेदी या "महाराष्ट्र द्रोह्यांना हटवा, महाराष्ट्र वाचवा" या निषेध आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गुरूवारी (दि.7) बीड शहरातील सुर्या लॉन्स, कॅनॉल रोड बीड येथे सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस तमाम शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment