Monday, April 4, 2022

मुख्याधिकारी नगर परिषद बीड निलंबन.आघाडी सरकारचा बॉम्ब फुसक ! ! !

बीड  (प्रतिनीधी) बीड नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या कारभाराच्या बऱ्याच तक्रारी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात होत्या या सर्व तक्रारी पाहून मा. विनायकराव जी मेटे  (आमदार विधान परिषद) यांनी मुद्दा उपस्थित केला होता स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या बातम्या लावण्यात आल्या होत्या त्यामध्ये मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये उल्लेख होता आमदार साहेबांनी विधानपरिषदेत बीड नगरपरिषद घोटाळ्याचा बॉम्ब फोडला व पाच जण आवर्ती निलंबनाची कारवाई झाली परंतु या आघाडी सरकार ने ना त्यांचे निलंबन झाले ना त्या बॉम्बचा कुठे फरक पडला आघाडी सरकारचे व मा. विनायकराव जी मेटे  विधान परिषद आमदार यांचे बॉम्बे फुसकेच निघाले असा आरोप आम्ही करत आहोत हा बॉम्ब फुसका का झाला याची चौकशी झाली पाहिजे व हा बॉम कोणत्या सेटलमेंट मुळे फुसका झाला हे देखील जनतेसमोर यायला पाहिजे या मधील दारू कोणाच्या सांगण्यावरून काढून घेण्यात आली याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि बीड नगर परीषद मध्ये असलेले मुख्याधिकारी यांचे निलंबन तात्काळ करून योग्य ती चौकशी करून बीड शहरांमध्ये होत असलेला अन्याय थांबला पाहिजे तो योग्य निर्णय करावा असे निवेदन आम आदमी पार्टी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे व जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोम मारो आंदोलन करणार आहे

No comments:

Post a Comment