Saturday, April 2, 2022

समाजापुढे एक वेगळा आदर्श परळी येथील आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरी उभारली पुस्तकाची गुढी.






परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)  परळी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय परळी येथील रक्तपेढी वै. अधिकारी श्री. गीताजी लक्ष्मण चव्हाण यांनी आपल्या राहत्या घरी आज गुढीपाडव्यानिमित्त पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती. 
            सविस्तर वृत्त असे की गीताजी चव्हाण हे एक शासकीय आरोग्य कर्मचारी असून त्यांनी आज सकाळी नऊच्या सुमारास ही पुस्तकाची गुढी उभारली. यामध्ये कथासंग्रह, कादंबरी कविता नाटक चरित्र, पर्यावरण कलात इतिहास भूगोल व आपल्या संग्रहातील   स्पर्धा परीक्षाची पुस्तके एकत्र करून त्या पुस्तकाची गुढी उभारली. या पुस्तकाच्या गुढीला फुलांचा हार, साखर व फुलांनी सजवण्यात आली होती. एक प्रकारची आगळीवेगळी गुढी या निमित्ताने उभारण्यात आली होती. खऱ्या अर्थाने आपले जीवन हे पुस्तकांनीच सार्थी लावले असे त्यांनी सांगितले.

1 comment: