Thursday, April 7, 2022
परळी शहरातील अवैधरित्या राखेची उघडी वाहतूक बंद करावी -बालाजी चाटे
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):- परळी शहरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या लगत अवैधरित्या राखेची उघडी वाहतूक सर्रासपणे सुरू असून ही राख मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडत जात आहे त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही उघड्यावर होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी युवक नेते बालाजी चाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औष्णिक केंद्राच्या लगत असलेल्या राखेच्या साठ्यातील उघडी वाहतूक टिप्पर च्या माध्यमातून सर्रासपणे सुरू असून या राखेमुळे अनेक अपघात होत आहेत. ही उघडी राख हवेत उडून अनेकांच्या डोळ्यात जात असल्याने मोठमोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे नागरिकांना सोशल संस्थेशी निगडित आजार मोठ्या प्रमाणात जोडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन महसूल प्रशासन याप्रकरणी गप्प का यामागे काय गौडबंगाल आहे. असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने उघड्या राहत वाहतुकीसंदर्भात कारवाई करावी. तसेच सदरील राखेवर पाणी मारून व ती झाकून वाहतूक करण्यात यावी असेही युवक नेते बालाजी चाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment