Saturday, April 16, 2022

मनसेच्या वतिने आयोजित हनुमान चालीसा वाटप व पठण कार्यक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद -वैजनाथ कळसकर.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी)  परळी शहरातील मोंढा मार्केट येथील संकट मोचण हनुमान मंदीर येथे सकाळी हनुमान चालीसा वाटप व पठण कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाला परळी पंचक्रोशीतील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या भुमिकेचे व परळी शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राज्य सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन यांच्या सुचणे वरून मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली, परळी वैजनाथ शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली परळीतील हनुमान मंदीरात हनुमान चालीसा वाटप व पठण कार्यक्रम घेण्यात आला, या वेळी शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, महेश शिवगण, सुमित कलशेट्टे, रुषीकेश बारगजे, शहर सचिव डॉ.अशोक मंत्री,म.न. वि.से.चे हाणुमान सातपुते, परळी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, शाखा अध्यक्ष धनराज आव्हाड, बालाजी चुणचुणे,माणीक लटींगे, महेश घेवारे सुहास विर, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, सुनील भोसले, किशोर कुरे, श्रीमंत फड, सिद्धार्थ लांडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment