बीड (प्रतिनिधी) गजानन सहकार सुतगिरणी मर्या. ईट ता.जि.बीड ची निर्मिती सन 1990 ची असून या सुतगिरणीतून 2018 पर्यंत एक सुताचा धागा बाजारपेठेत आला नाही. बीज भांडवल मात्र दोनशे कोटीच्या पुढे घेतले खर तर दहा वर्षे बंद असणाऱ्या सहकार उद्योग कारखान्यास बंद करणे नियमाचे असते तसेच असे उद्योग काळ्या यादीत टाकणे कायदेशीर असतानी या सुतगिरणीचे मालक आमदार, कॅबीनेट मंत्री राहिल्याने त्यांनी खाजगीकरणातून अवैध रक्कम मिळवण्याकरिता ही सुतगिरणी पद प्रतिष्ठाच्या जोरावर नुतनीकरण करून चालूच ठेवली असे उद्योग सुशिक्षीत बेकारांना दिले जातात. परंतू यांनी नियमांचे उल्लंघ करून राज्यकर्ते व लाभार्थी दोन्ही लाभाने यांनी सुतगिरणी नावे करून आपली इच्छापूर्ती वास्को द गामा प्रमाणे करून घेतली. तरूणांना राजकारणात गुंतवून बेरोजगारीत ठेवले. बंद गिरणी असतानी 2017 मध्ये सहकार वित्तीय संस्था दिल्ली कडून कर्ज घेतले व कोरोना महामारीत परराज्यातून मजूर आणले, गर्दी केली व रोग वाढवला. शत्रु राष्ट्र चीनला जहाजाने माल पाठवला. केंद्र सरकार व राज्य सरकारशी साठगाठ करून हा उपद्रव केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दाऊद इब्राहीमची बहिण सबनम पारकरला मंत्री नवाब मलीक यांनी मदत केल्यामुळे शत्रु व्यक्तीस मदत केल्यांने गजाआड करण्यात आले. मात्र चीन शत्रु राष्ट्राचे संबंध चांगले नसतानी उद्योग व्यवसाय केला. यांना मात्र कोणी विचारणा करीत नाहीत. हा शंका कुशंकेचे भाग आहे. सुतगिरणी 2018 ला चालु केल्याने सर्व घडले व 2020 मध्ये सुतगिरणीचे शॉर्टसकट झाले विद्युत अभियंताने अहवाल देवून 10 करोडचे नुकसान दाखवले. या गैरप्रकारावर मी उपोषण आंदोलन केली. सत्ता पुढे शहाणपण चालत नाही, या म्हणीप्रमाणे कोठेही कारवाई होत नाही. त्यावर माझे अपील आहे. केंद्र सरकारकडे याची दाद मी मागणार आहे. महाराष्ट्र सुतगिरणी फेडरेशन, मुंबई यांना अनागोंदी माहित असतानी प्रथम क्रमांक सुतगिरणीचा संबोधन आंधळ दळीत कुत्र पीठ खातं असा प्रकार आहे. बाजारपेठ सुत गिरणी करीता उपलब्ध नाही. तांत्रिक आर्थिक नियोजन नाही, व्यवस्थापन उत्कृष्ट तर नाहीच कायम स्वरूप मजूर ही अद्याप उपलब्ध नाहीत. सुतगिरणी मालक यांच्या कुटूंबाकडे सैनिक स्कूल, शाळा, कॉलेज या मुलांची उपस्थिती लावून यांची खाजगी कमाई करण्याचे उद्योग हे चाणाक्ष बुध्दीने करत आहेत. परंतू 99 टक्के विद्यार्थी बेरोजगार करून मनमुक्त यांची घोडदोड चालु आहे. यांनी 2020 मध्ये भारतीय संरक्षण खात्याशी संपर्क करून त्यांच्या सैनिक स्कूलमध्ये सैन्य भरती ठेवून संरक्षण विभागात हस्तक्षेप केला आहे हे कृत्य देशरक्षण खात्यात केल्याने सैनिक सबलीकरणास धोका आहे. असे फैलेने संरक्षण विभागची प्रतिमा मलीन होण्यास किंचीत शंका नाही, हे गिरणी मालक खाजगीकरणांचे मोठे मालक झाले आहेत. मंत्री, आमदार नसल्यास हे बंद उद्योगात लक्ष घालून खाजगीकरणांचे पुरस्कर्ते होताना दिसून येते. सर्व खाजगी उद्योग यांच्याकडे जीवन आवश्यक साधने यांच्याकडे घेवून यांनी येथील तरुण बेरोजगारांना देशोधडी लावले आहे. गॅस एजन्सी, दुध डेअरी, सहकार सोसायटी, सहकारी बैंक, विवादीत जमीन, सरकारी जमीन, बीड शहरातील मोक्याच्या जागा याची देखभाल करण्याकरिता
यांचे सर्व कुटूंब राजकारणात जनतेला झुलवा झुलवी करीत आहेत. बाहेर जिल्हा राज्यात ही यांनी उद्योग धंदे वाढवले आहेत. • यांच्या गजानन सहकार सुतगिरणी, गजानन नागरी सहकारी बँक, आदर्श शिक्षण संस्था, नवगण विनायक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, बीड, तालुका खरेदी विक्री संघ, गजानन सहकारी साखर कारखाना या संस्था आहेत. सुतगिरणी मर्या. ईट चा इतिहास समजदार नागरीकांना समजला असेल. गजानन सहकार साखर कारखाना नवगण राजुरी 90 कोटी थकीत कर्ज, कामगार वाच्यावर कारखाना बंद, आदर्श शिक्षण संस्था, जमिनीचा विवादीत प्रश्न, गजानन नागरी सहकारी बँक च्या तोडीच्या बँका येथे यांनी उभा राहू दिल्या नाहीत. स्वताःच्या बँकेचा पसार यांनी पसरवण्याचे काम चालु केले आहे.
मौजे पिंपळगांव मांची गौण उत्खन्न नदीवर करून रेल्वे रुळाला खडी पुरवल्याचे पैसे हे बेमाफ घेत आहेत. या उत्खन्नने जमिनी नापिक होत असून मानव प्राण्यांचे प्रदुषणाने बेहाल करून जीवन मान धोक्यात आले आहे. अशा अनेक प्रकाराने त्यांचे खाजगी क्षेत्रात उच्चांक वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यांच्या सुतगिरणी व अन्य संस्था विषय येणाऱ्या बातम्या म्हणजे सो चूहे खाके बिल्ली चली हज को सुत गिरणीचा प्रथम क्रमांक दर्शवून जनतेची दिशाभूल करून आपले स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आहे, हे आता प्रथमदर्शनी दिसून येते.
No comments:
Post a Comment