Tuesday, April 5, 2022

वंचित बहुजन आघाडीच्या सभासद नोंदणीस परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद - बालासाहेब जगतकर

                          
 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी च्या सभासद नोंदणीस परळीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड पूर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी माहिती दिली आहे.                               याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात पक्षवाढीसाठी एक एप्रिल 2022 ते 4 एप्रिल 2022 पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे डिजिटल सभासद नोंदणी करण्याचे आदेश आले असता परळी येथील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी परळी शहरातील मोंढा मार्केट येथे वंचित बहुजन आघाडी च्या डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित केला असून या नोंदणीत शेकडो सभासद नोंदणी करण्यात आली असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे बीड पूर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर जिल्हा सचिव अडवोकेट संजय रोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे युवक जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे युवक जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रोडे वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संजय गवळी तालुका महासचिव विष्णुपंत मुंडे परळी शहराध्यक्ष गफार शा खान युवक नेते राजेश सरोदे कोषाध्यक्ष राजू भुतके सचिन रोडे अमित सावंत इत्यादी सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड पूर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment