पुणे : सध्या राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तापमान ४२ अंशाच्या वर गेल्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पण, आता राज्यातील काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर काही भागांत सध्या चालू अहलेली उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही हवामान खात्याने केले आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं. महत्वाचं काम असेल तर उन्हापासून स्वतःचा बचाव करून प्रवास करावा. तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल. अशा सूचना हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणात उष्णतेची लाट आली होती. तापमान अचानक वाढलं होतं. तसेच मुंबईत देखील तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत होता. पण, आता कोकणवासियांना आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ५ आणि ६ एप्रिलला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात सध्या सर्वत्र उकाडा वाढला असून उष्णतेची लाट आलेली आहे यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने त्या भागातील लोकांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment