Sunday, April 3, 2022

जिल्हाप्रशासनाची दडपशाही अजित पवारांची चौकशी लावली म्हणून सुडबुद्धीने शार्दुल देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल.

*मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर .

बीड (प्रतिनीधी) माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे यांच्यावरील दाखल गुन्हा हा माहिती आधिकार कार्यकर्त्यांवर दडपशाहीचा प्रकार असुन भविष्यात प्रशासनाच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी केलेला भ्याड प्रयत्न असुन अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या विरोधात अवर मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी प्रस्तावित असल्यामुळे  सुडबुद्धीने दाखल शासकीय कामकाजात अडथळा आणणे अंतर्गत कलम ३५३,३३२,५०६ भादंवि अंतर्गत गुन्हा रद्दबातल करून उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अजित पवार यांच्या विरोधातील तक्ररींची वरील स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना केली आहे. 

सविस्तर माहीतीस्तव 
____
माहीती आधिकार कार्यकर्ते असुन अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला असुन लोकसेवक दिगंबर मुरलीधर चाटे आरोग्य सेवक (पु)प्राथमिक आरोग्य केंद्र युसुफवडगाव ता. केज जि.बीड यास विभागीय चौकशीस अनुसरून शासन सेवेतुन बडतर्फ करण्याचे नेमुन दिलेले काम पार पाडण्यास कसुर करणारे अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या विरोधात शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यांना शासन सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे याविषयी दि.०४ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार केल्यानंतर त्या अनुषंगानेच परमेश्वर बाबर अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रारीच्या अनुषंगानेच मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांच्या विरूद्ध प्रस्तुत तक्रारीमध्ये तथ्य आढळुन येत असल्यास उचित प्रस्ताव शासनास पाठवण्याबाबत नमुद केले असून त्याचाच राग मनात येऊन अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी तक्रारदारावर दबाव आणण्याच्या हेतुने व भविष्यात आपल्या विरोधात तक्रारी करू नयेत यासाठीच दि.० एप्रिल २०२२ रोजी दि. १ एप्रिल २०२२ रोजी शार्दुल देशपांडे यांनी अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न केला तसेच मिटींग सुरू असताना प्रतिबंध केल्यामुळे हुज्जत घालून शिपाई पवार यांना धक्काबुक्की केली, धमकी दिली आदि मनघडंत घटना सांगुन बीड शहर पोलीस ठाण्यात कलम ३५३,३३२,५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्यंत बनावट गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तात्काळ रद्द करण्यात येऊन उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी .

अजित पवार यांची भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई:-डाॅ.गणेश ढवळे 
______
अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड हे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करत असल्याबद्दल मी सुद्धा पुराव्यासह विभागीय आयुक्तांना तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी अजित पवार यांना माझ्या तक्रारीच्या अनुषंगानेच चौकशीचे आदेश काढल्यानंतर उमराई ता.अंबाजोगाई ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो कामातील ७ लाख रूपये गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली होती  त्यामुळेच अजित पवार यांची कार्यपद्धती ही भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करण्यासारखी असुन कारवाई करण्यात दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल बरेचशा तक्रारी पुराव्यासह देता येतील त्या सविस्तर भविष्यात आम्ही देऊ देखील त्यामुळेच अजित पवार यांच्या विरूद्ध प्रस्तुत तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी. 


No comments:

Post a Comment