परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हवामान खात्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार या इशाऱ्यानंतर आज दुपारी परळीतील वातावरनात अचानक पणे बदल निर्माण होऊन नभ भरून आले. यानंतर काहीच वेळात परळी व परिसरामध्ये वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरींची बरसात झाली. यामुळे काही कालावधीपुरता वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सर्वांनाच हायसे वाटले.
गेल्या काही दिवसापासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक बेचैन होत असून रस्त्यावर दुपारच्या सत्रात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. उष्णतेमुळे होणारी अंगाची काहिली रोखण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत असून मुके प्राणिमात्र, पक्षी आदींसह इतर वन्यजीव देखिल उन्हाचा पारा वाढल्यानंतर उन्हापासून बचाव करण्यासाठी निवारा शोधत आहेत. अशातच आज दुपारनंतर अचानकपने झालेल्या वातावरणातील बदलानंतर लागलीच परळी व परिसरामध्ये मध्यम वाऱ्यासह पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. या रिमझिम पावसाच्या सरीनंतर परिसरामध्ये गारवा निर्माण होऊन थंडाव्याची एक लहर निर्माण झाली. या अल्पशा पावसामुळे उन्हाच्या तडाख्यापासून काही काळ का होईना बचाव होऊन सर्वांनाच थोडे हायसे वाटले.
No comments:
Post a Comment