Thursday, April 7, 2022

महसुल संघटनेच्या बॕनरवर सत्यमेव जयतेचा लोगो, शासकीय लोगो खाजगी लोकांना वापरता येतो का? :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड  (प्रतिनीधी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तथाकथित महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय हांगे यांनी बॅनर वर जो सत्यमेव जयते चा लोगो लावलेला आहे तो जाणकार वकिलांच्या म्हणण्यानुसार लावताच येत नाही, विशेष म्हणजे महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० राशनकार्ड गायब प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहेत, त्यांची चौकशी वगैरे सुरू आहे, आ.संदिप क्षीरसागर बीड यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा मागणी नंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनजी भुजबळ यांनी संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. 
   ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात ७ वेळा निवेदन, आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांच्या ५ वेळा जिल्हाधिकारी बीड यांना कार्यवाहीबाबत आदेश दिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती .
शेवटी जिल्हाधिकारी बीड यांनीच वरिष्ठांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी विभागीय आयुक्तांकडे कारवाई साठी फाईल पाठवली आहे...

No comments:

Post a Comment