Tuesday, April 5, 2022

राज्याच्या राजकारणात खळबळ! शिवसेनेचे १३ ते १४ खासदार संपर्कात असल्याचा, भाजपाचा मोठा दावा !




* दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांनी संजय राऊतांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचं देखील बोललं जात आहे.

मुंबई ;- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून सरकार पडण्याबाबत विधानं केली जात होती. आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या राज्यातील १८ खासदारांपैकी १३ ते १४ खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदारांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगत त्या आधारावर २०२४ मध्ये हे खासदार हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत जोडले जातील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे हे नेमके कोणते खासदार आहेत, यावरून चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना खासदारांची संजय राऊतांकडे तक्रार?

दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांनी संजय राऊतांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचं देखील बोललं जात आहे. या चर्चांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं असून नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत, याविषयी अंदाज लावले जात आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार भाजपासोबत जोडले जातील, या प्रसाद लाड यांच्या विधानामुळे चर्चेनं अधिकच जोर धरला आहे.

No comments:

Post a Comment