Monday, July 13, 2020

बीड जिल्हातील दहा पेक्षा जास्त पोलीस ठाण्याचा करभार चालतो प्रभारी आधिकारीवर्गावर.

बीड (प्रतिनीधी ): पोलीस प्रशासनामध्ये कर्मचार्‍यासह अधिकार्‍यांचा तुटवडा
आहे. कर्मचार्‍याच्या तुटवड्यामुळे इतर कर्मचार्‍यावर कामाचा ताण पडतो. जिल्ह्यातील जवळपास दहा पेक्षा जास्तपोलीस ठाण्याचा भार प्रभारी
अधिकार्‍यावर आहे. रिक्त असलेली पदे वर्षानुवर्ष भरली जात नाहीत. रिक्तपदे कधी भरली जाणार असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. बीड जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांची संख्या प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यामुळे इतरांवर कामाचा ताण पडतो. ठाणे प्रमुखांची रिक्त पदे असल्याने इतरांना त्याचा चार्ज दिला जातो.जिल्ह्यातील बीड शहर, ग्रामीण, पेठ बीड, बीड वाहतूक शाखा, धारूर, वडवणी,दिंद्रूड, नेकनूर, यासह इतर पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकार्‍यावर
चालत आहे. लोकसंख्येनुसार जास्त पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवायला
हवी. मात्र गृहविभाग वर्षानुवर्षे जागा भरत नसल्याने कर्मचार्‍यांसहअधिकार्‍यांचा तुटवडा निर्माण होत आहे.

No comments:

Post a Comment