परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : वीरशैव लिंगायत सभा आणि वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व पोटजातींसाठी ह्या कार्यक्रमांतर्गत वक्तृत्व, रांगोळी, आणि चित्रकला स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धा
- विषय: महात्मा बसवेश्वर चरित्र, अनुभव मंटप, वीरशैव संत परंपरा.
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-
- तृतीय बक्षीस: ₹११००/-
- वय: ८ ते १६ वर्षे
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी ११ ते दुपारी १.
- प्रवेश: विनामूल्य
रांगोळी स्पर्धा
- विषय (वय ८ ते १६ वर्षे): म. बसवेश्वर, बेटी बचाव पाणी वाचवा
- विषय (वय १६ वर्षांपासून पुढे): निसर्ग चित्र डिझाईन मुक्तहस्त
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-
- तृतीय बक्षीस: ₹११००/-
- आकार: 4x4
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी १० ते १२.
- प्रवेश: विनामूल्य
चित्रकला स्पर्धा
- विषय: पर्यावरण, दहशतवाद, म. बसवेश्वर प्रतिमा
- प्रथम बक्षीस: ₹३१००/-
- द्वितीय बक्षीस: ₹२१००/-
- तृतीय बक्षीस: ₹११००/-
- वय: ८ ते १६ वर्षे
- तारीख व वेळ: सोमवार, २८ एप्रिल २०२५, सकाळी १० ते १२.
-प्रवेश: विनामूल्य
-टीप: स्पर्धेचा पेपर आयोजकांच्या वतीने पुरवण्यात येईल. स्पर्धकांनी रंग व साहित्य स्वतः सोबत आणावे.
जयंती महोत्सव व बक्षीस वितरण सोहळा
- महात्मा बसवेश्वर महाराजांचा जयंती उत्सव बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
- स्थळ: संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर, बेलवाडी, परळी वैजनाथ.
- या दिवशी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
नाव नोंदणी आणि संपर्क:
- नाव नोंदणीसाठी संपर्क: शेखर फुटके - 9325063512
-अधिक माहितीकरिता संपर्क: 9021504779, 9763106645, 8888356173
सर्व वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त असे आवाहन शिवकुमार केदारी उपाध्यक्ष वीरशैव विकास प्रतिष्ठान यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment