बीड (प्रतिनिधी) राज्यात कायदा व सुव्यवस्थेच किती धिंधवडे निघाले आहेत, हे शुक्रवारी घडलेल्या घटनेवरून लक्षात येईल. कारण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नव्हे गृहमंत्रालय ज्यांच्या ताब्यात आहे, ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेला आहे आणि दुसरी तिसरीकडे नाही तर बीडमध्ये ही घटना घडली आहे.
आता मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्यांना द्यावी लागावी, ही म्हणजे गृहखात्याची मोठी नामुष्कीच आहे, नाही का. कदमांचा मोबाईल पोलीस अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर चोरीला गेला आहे. म्हणजे दिवसाढवळ्या चोरी होते हे ऐकले होते पण पोलिसांच्या नाकासमोरून, माध्यमांचे कॅमेरे असताना देखील त्यांचा मोबाईल लंपास होतोय म्हणजे तेथील चोरटे किती हातचलाखीने हे काम करतात हे समोर येत आहे.
योगेश कदम यांनी केज पोलिसांत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. कदम हे बीड दौऱ्यावर असताना मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या सांत्वनासाठी गेले होते. यावेळी माध्यमे देखील समोर होती. तेथून कदम यांचा मोबाईल पळविण्यात आला आहे. हे समजताच शोधाशोध सुरु झाली, परंतू कुठेच सापडत नसल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment