परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जि प प्रा शा संगम शाळेत आज दि 29 जून 24 रोजी शिक्षक पालक मेळावा नुतन परळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री यादव पल्लेवाड,ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ नागरगोजे ,मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले.प्रास्तविक मुख्याध्यापक अशोक नावंदे यांनी करताना बैठकीच्या आयोजना बाबत व विध्यार्थी लाभाच्या योजना बद्दल माहिती सांगितली .
केंद्रप्रमुख श्री पल्लेवाड यांनी शाळेच्या विकासासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगितले व विध्यार्थी विविध शिष्यवृत्ती योजना बाबतची माहिती सांगून असाक्षर पुरुष,महिलांना साक्षर करण्याची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यासह कुटुंबातील सदस्य यांनी घेऊन सप्टेंबर अखेर सर्वांना साक्षर करावे असे आवाहन केले.
पालकांच्या वतीने ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाळेला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे व असाक्षरांना वही, पेन व उजळणी पुस्तक वाटप करण्याचा मनोदय व्यक्त करून शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर ,सुभाष कोंकेवाड सर,शिक्षिका श्रीमती कल्पना बडे मॅडम व बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment