*श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे कीर्तनास भाविकांची गर्दी.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर माऊली म्हणजे साक्षात पांडुरंगच होय, मातृत्व, कर्तृत्त्व , नेतृत्व आणि दातृत्व यां सर्व गुणांची खाण संत ज्ञानेश्वर दादा माऊली मध्ये होती. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली प्रमाणेच दादा माऊलींचा देखील सर्वांवर आशीर्वाद, प्रेम सारखेच होते असे प्रतिपादन बाल कीर्तनकार ह.भ.प. कु.जनाई महाराज कोकाटे (संगमकर) यांनी केले.
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे 24 व्या पुण्यतिथी उत्सवात पाचव्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना बाल कीर्तनकार ह.भ.प. कु.जनाई महाराज कोकाटे (संगमकर) बोलत होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती परळी विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड,राधाकिशन साबळे,फडकरी,जगमिञ जाधव, अ.भा वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे विसाव्या शतकातील महान संत होती सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 24 व्या पुण्यतिथी सोहळ्यात पाचव्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना बाल कीर्तनकार ह.भ.प. कु.जनाई महाराज कोकाटे (संगमकर) यांनी संत तुकाराम महाराज यांच्या
नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।
न लगती सायास जावे व नंतर वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥धृ॥
ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥
यां अभंगावर सुंदर चिंतन मांडले. चाकरवाडीचे माऊली म्हणजे साक्षात पांडुरंग होय, दादा माऊलींचे जीवन हे परमार्थिक साधकांसाठी आदर्श होते.नामस्मरण आवर्ती श्रद्धा आणि निष्ठा होती. तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना तेवढेच प्रेम ते द्यायचे. त्यांच्या अनेक चमत्कार आणि आठवणी आज ही लोकामध्ये सर्वश्रुत आहेत.बंकट स्वामी महाराज संस्थान आणि श्रीक्षेत्र चाकरवाडी यांचे घनिष्ठ नाते आहे. दादा माऊलीचे जीवन दातृत्व नेतृत्व ,कर्तृत्व आणि मातृत्व या गुणां ओतप्रोत भरलेले होते. किर्तन भजनातून ज्ञानदान आणि अन्नदानाच्या माध्यमातून लोकांना तृप्त केलें. दादा माऊलींचे नामस्मरणावरती खूप मोठे प्रेम होते. या दरबारात आल्यानंतर काही सांगण्यापेक्षा त्यांच्या चरणावरती माता ठेवण्यातच धन्यता आहे. श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आल्यानंतर नम्रता काय असते ? याच मूर्तीमंत स्वरूप म्हणजे दादा माऊली होतें. अध्यात्मातील अनेकांना नम्र कसं व्हायचं हे माऊलींनी शिकवलं ते योगपुरुष होते.
माऊलींच्या वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आता दयाते ऐसी! पुर्ण चंद्रिका जैसी!! निववीता न कळसी ! साना थोर!!
पहिल्या दिवशी मंगल करावे लागते संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये मंगल केले तर चांगदेव पासष्टी मध्येही आशीर्वादाने मंगल पाहायला मिळते.. देवाचे नाव मंगल आहे सकळ मंगळनिधी! श्री विठ्ठलाचे नाम आधी!! असा दाखला बाल कीर्तनकार ह.भ.प. कु.जनाई महाराज कोकाटे (संगमकर) यांनी दिला.
या कीर्तनासाठी साथ राजेभाऊ महाराज मांडवेकर,रानबा महाराज फड,दता महाराज गडदे,माधव महाराज उखळीकर,आशोक महाराज कराळे,राधिकाताई जायभाय,चेतनाताई गौरशेटे,सावातीताई ताटे अश्विनीताई बडे, साथसंगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य नामांकित गायक वादक मंडळींची उपस्थिती सर्वांचे आभार रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले
No comments:
Post a Comment