चाकण (प्रतिनिधी) : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची खेड तालुका कार्यकारणी दि-२२ नोव्हेंबर २०२३ रोजी संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी जाहीर केली आहे. खेड तालुका कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून नितीन गोपीचंद सैद यांची निवड करण्यात आली आहे.

खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी लहू शंकर लांडे, उपाध्यक्षपदी मनोहर किसन गोरगल्ले, सचिवपदी आशिष अण्णासाहेब ढगे पाटील तर, संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. प्रितम रामदास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या खेड तालुका कार्यकारणीत निवड झालेल्या पदाधिकारी यांना पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी नियुक्त पत्र वाटप केले.

यावेळी संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, विश्वनाथ केसवड आदि मान्यवर उपस्थित होते.
नितीन सैद, नवनियुक्त अध्यक्ष खेड तालुका..
No comments:
Post a Comment