बीड :- कोरोनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असून रुग्णसंख्येत दिलासादायक घट पडत आहे. रुग्णसंख्येत घट पडत असली तरी मास्क विना फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे तर अनेक ठिकाणी गर्दी देखील वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांची वाढती गर्दी कोरोनाचा कहर वाढवण्यास आमंत्रण देत आहे. प्रत्येकाने कोरोना विषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment