वरील प्रमाणे 06 महिने कालावधीचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु करण्यासाठी विभागीय केंद्र औरंगाबाद अंतर्गत असणाऱ्या कृषी महाविद्यालय, कृषी प्रशिक्षण संस्था, आत्मा कार्यालये, सेवा भावी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंमसेवी संस्था, बहुउद्येशीय संस्था, इतर संस्था अशा इच्छुक संस्थेकडून वरील शिक्षणक्रमाचे नविन अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाने मागविण्याचे निश्चीत केले आहे. यासंदर्भातील सर्व सविस्तर माहिती विद्यापीठाचे संकेतस्थळ WWW.YCMOU.DIGITALUNIVERSITY.AC वर उपलब्ध आहे.
ज्या संस्थेकडे हे शिक्षणक्रम राबविण्यासाठी शैक्षणिक व भौतीक सुविधा उपलब्ध आहेत अशा संस्थांनी दि.30 नोव्हेंबर 2020 पुर्वी नविन अभ्यासकेंद्र मागणी अर्ज ऑनलाईन सादर करावा. आपल्या परीसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अशा कौशल्यपुर्ण शिक्षणक्रमाद्वारे निश्चीतच रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकतील व त्यांच्या हाताला कुशल काम मिळू शकेल. हे शिक्षणक्रम सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थेनी नविन अभ्यासकेंद्र मागणी प्रस्ताव ऑनलाईन लवकरात लवकर विद्यापीठाकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधावा. (0240) 2371066 / 2371077
No comments:
Post a Comment