Monday, July 6, 2020

तलवाड़ा पोलिसा कडुन कल्याण सट्टा मटक्याला सुट.बाकी लाॅक डाॅऊनच्या सर्व प्रक्रिया व्हेरी गुड.


गेवराई ;-( प्रतिनिधि )देशाच्या राजधानी दिल्ली सह राज्यात कहर माजवना-या कोरोना महामारी मुळे गेल्या काही महिन्या पासुन केंद्र व राज्य शासनाने देशा सहित राज्यभरात लाॅक डाॅऊनच्या सूचना दिल्या होत्या त्या आणुषंगाने देश व राज्यातील पोलिस बांधवांनी स्वताच्या जिवाची तमा न बाळगता परिस्थिति योग्य पध्दतिने हाताळली होती. कोरोनाच्या धरतीवर तलवाड़ा पोलीसांनी बजावलेल्या योग्य भूमिका मुळे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्रच्या वतीने तलवाड़ा पोलीस ठाण्याच्या काही पदाधिका-यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव ही करन्यात आलेला आहे परंतु ज्या ठिकाणी आर्थिक ऊलाढालीचा विषय येतोय त्या त्या ठिकाणी मग गर्दी व जमाव जमत आसलं तरी तलवाड़ा पोलीसांना चालते कसे आसा सवाल नागरिकातुन उपस्थिति केला जात असुन तलवाड़ा पोलीस ठाणे हाद्दीत आज पर्यंत कोरोना मुक्त परिस्थिति आसली तरी काही बाबतीत तलवाड़ा पोलीसांची भूमिका आम्ही मारल्या सारखे करु तुम्ही रडल्या सारखे करा आशा पध्दतिची आसल्याचे नागरिकातुन बोलले जात असुन जिल्हाधिकारी साहेबांनी शासन आदेशा नुसार लाॅक डाॅऊन मध्ये  दिलेल्या शितीलतेतुन तलवाड़ा परिसरात कलम 144 चा फज्जा ऊडाल्या सदृश्य परिस्थिति तलवाड़ा पोलीस ठाणे हाद्दीत सर्वत्र दिसुन येत असुन तलवाड़ा परिसरातील चहा फराळाचे हाॅटेल व किराणा दुकान आदेशा नुसार वेळेवर बंद होत आसले तरी कल्याण सट्टा मटका नावाचा जुगार विविध ठिकाणी सरास सुरु आसल्याचे चित्र पाहन्यास मिळत असुन सकाळी सहा ते रात्री दहा वाजे पर्यंत मटका बुक्की खचा खच भरलेले दिसुन येत. आसतांना आर्थिक ऊलाढालीची दरवळ तलवाड़ा पोलीसांना आकर्षित करते कि काय आसा प्रश्न सुज्ञ नागरिकातुन उपस्थित केला जात असुन तलवाड़ा पोलीस इतर व्यवसाइकांना जसे नियमावली दाखवते तशी परिस्थिति नुसार मटका दारु व इतर धंद्याना लागु होत नाही का? मटक्याच्या बुक्की मध्ये  मटक्याचा चार्ट एका व्यक्तीच्या हातात असतो तर अनेक  जन एकत्रीतरित्या त्यात मुंडके खुपसुन बसतात मटका बुकीतील गर्दी तलवाड़ा पोलीसांना दिसत नाही का? आसा प्रश्न निर्माण होत असुन बाकी परिस्थिति व्हरी  गुड असुन कल्याण सट्टा मटक्यालाच सुट कशी?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

No comments:

Post a Comment