Tuesday, July 7, 2020

भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या.

* भाऊकीतील जमीनीचा वाद विकोपाला, जि.प. सदस्य पती राणा डोईफोडेसह चौघा जणांविरोधात गुन्हा
 दाखल.

नेकनूर;- (प्रतिनीधी ) वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून काल दोन भावांमध्ये भांडण झाले. यामध्ये एका जणाविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला होता. ज्या भावाविरोधात गुन्हा दाखल झाला त्या भावालाच त्याच्या पुतण्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे सदरील शेतकर्‍याने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली. ही घटना डोईफोडवाडी येथे घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात पाली सर्कलच्या जि.प.सदस्या यांचे पती राणा डोईफोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 किसन धोंडीबा डोईफोडे व सर्जेराव डोईफोडे हे दोघे सख्खे बंधू आहेत. यांच्यात वडिलोपार्जित जमीनीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. काल किसन डोईफोडे हे आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांनी बोअर सुरू केला असता सर्जेराव धोंडीबा डोईफोडे, राणा सर्जेराव डोईफोडे, कालिंदा डोईफोडे, शीतल डोईफोडे, मनोज डोईफोडे या सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी किसन डोईफोडे यांच्यावरच नेकनूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री नऊच्या दरम्यान वरील सर्व मंडळी किसन डोईफोडे यांच्या घरी आली व तुम्हाला दाखवतोत, असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देऊन निघून गेले. रात्रीच्या दरम्यान किसन डोईफोडे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नेकनूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक केंद्रे, विलास जाधव, रोटे, आदटराव, ढाकणे, शिंदे, यूनूस बागवान यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चुलता, चुलत भाऊ व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या  जाचास कंटाळून माझ्या पित्याने आत्महत्या केल्याची तक्रार प्रदीप किसनराव डोईफोडे (वय २५, रा. डोईफोडवाडी) यांनी दिली. त्यानुसार आरोपी राणा डोईफोडे, सर्जेराव डोईफोडे, कालिंदा डोईफोडे, शीतल डोईफोडे या चौघांविरोधात कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment