Friday, July 3, 2020

परळीत हिंद लॅबला आग.लाखोचे नुकसान कोणतीही जिवीतहानी नाही.


परळी वैजनाथ-;(प्रतिनीधी )परळी शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या लॅबला आज सकाळी आग लागली. या आगीमुळे लॅबमधील विविध साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत संबंधिताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
परळी येथील महाराष्ट्र बॅक समोरील डॉ.मंडलेचा यांच्या इमारतीत असलेली हिन्द लॅबला आज सकाळी ६ वाजता शॉर्टसर्किट मुळे आग लागून पुर्ण लॅब जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयाचे उपकरण जळुन खाक झाले आहेत. सुदैवाने लॅब मध्ये कोणतीही जिवीत हानी नाही. परिसरातील नागरिकांना आगीचा धुर दिसुन आल्याने नगरपरिषद अग्निशमन दलाला माहिती दिली. न.प.च्या अग्निशामक बंबने तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख सुनील आदोडे, वाहन चालक रोहित आदोडे, व फायरमॅन धोंडीराम भुसेवाड, गंगाधर मस्के यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

No comments:

Post a Comment