* शौचालयाच्या खिडकीतून उडी टाकून केले पलायन .
पंढरपूर; (प्रतिनीधी ) एका खून प्रकरणात सबजेलमध्ये असलेल्या आरोपीस पोलिसांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास आरोपीने शौचालयात जावून खिडकीच्या काचा काढून पलायन केले. या घटनेमुळे पोलीसात खळबळ उडाली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवान अ ा झाली आहेत. तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 380/2016, भादवि 302 मधील आरोपी शिवाजी भोसले (वय 55, रा. तिसंगी) हा सबजेलमध्ये होता. त्याला त्रास होऊ लागल्यामुळे पोलिसांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास तो शौचालयात गेला. बाहेर पोलीस उभे होते. बराच वेळ झाला तरी आरोपी बाहेर आला नसल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी दरवाजा ढकलून शौचालयात प्रवेश केला असता आरोपी दिसून आला नाही. मात्र शौचालयातील खिडकीच्या काचा काढून तो पळून गेला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र अंधार असल्यामुळे तो पोलिसांना सापडू शकला नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्यात पो.कॉ. सुजित जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड करत आहेत. आरोपी पळून गेल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथके गेली आहेत.
No comments:
Post a Comment