Sunday, July 5, 2020

परळी शहरात संचारबंदी लागु!!तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन घोषित.


परळी (प्रतिनिधी) -: शनिवारी परळी शहरातील एसबीआय बँकेतील पाच कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या कर्मचाऱ्यांचा बँकेच्या माध्यमातून परळी शहर आणि तालुक्यातील १६ गावातील नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संपर्क आल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा आगामी आठ दिवसांसाठी (म्हणजेच १२ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत) संपूर्ण परळी शहर लॉकडाऊन केले आहे. तर, तालुक्यातील १६ गावात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येऊन ती गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment