अहमदनगर -:(प्रतिनीधी ) पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज झाली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होत. आता इंदुरीकर महाराजांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. येत्या ७ ऑगस्टला इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स संगमनेर कोर्टाने बजावले आहे.
दरम्यान, या प्रकरणात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केलाय.
इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य महिलांसाठी अन्यायकारक आणि कायद्याविरोधात असल्याने तक्रार दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे.तर, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. इंदुरीकर समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजां वरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment