बीड;-(प्रतिनीधी )शेतकर्याची अडवणूक करत लाच घेताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरुर शाखा अधिकार्यासह दोघांना एसीबीने क्लिनबोल्ड केले असून बँकेची झाडाझडती सुरु असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी बाळकृष्ण हानपुडे यांनी सांगितले.
शिरुरच्या डीसीसी बँकेचा शाखा अधिकारी आणि त्याचे कर्मचारी हे शेतकर्यांची अडवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्रकार सुरु होते. याची तक्रार एका शेतकर्यांनी थेट लाचलुचपत विभागाच्या बीड कार्यालयात केल्यानंतर डीवायएसपी बााळकृष्ण हानपुडे यांनी आज दुपारी बँकेत सापळा रचल्यानंतर शेतकर्याकडून लाच घेतांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांनी शाखा अधिकार्यासह दोन कर्मचार्यांना ताब्यात घेतले असून बँकेची झाडाझडती सुरु केली आहे.
No comments:
Post a Comment