भाई द्वारकादास डावकर यांचे निधन (वय ६०) यांचे आज दुपारी राहत्या घरी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या मौज येथील द्वारकादास उत्तमराव डावकर यांनी शेतकरी कामगार पक्षापासून राजकारणाला सुरुवात केली. सुरुवातीपासून द्वारकादास डावकर यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, दिनदुबळ्यांसाठी रस्त्यावर उतरून काम केले. शेतकरी कामगार पक्षाची चळवळ जिल्ह्यात घराघरामध्ये नेली. बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा एकतरी आमदार असावा यासाठी त्यावेळेसचे शेतकरी कामगार पक्षात अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील असायचे. अखेर चौसाळा विधानसभा मतदारसंघातून भाई जनार्दन तुपे हे शेकापचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांना आमदार करण्यात द्वारकादास डावकर यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी आपल्या मौज येथील राहत्या घरी दिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, पुतणी असा परिवार आहे. डावकर कुटुंबियाच्या दु:खात कांतीकारी साथी न्युज परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment