बीड ;- (प्रतिनीधी ) बीड शहरामध्ये काल कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले. त्यातील एका रुग्णाचा संपर्क शहरातील विविध भागामध्ये आलेला आहे. या रुग्णांमुळे सामुहिक संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी 9 जुलैपर्यंत शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आज शहर सकाळपासून कडकडीत बंद होते. स्वत:हून नागरीक आपआपल्या घरात बसले असल्याचे दिसून आले. बुधवारी आढळलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेला होता तसेच अन्य ठिकाणीही फिरला आहे. शहरात सामूहिक संसर्ग वाढू नये यासाठी रात्री 12 वाजल्यापासून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सात दिवसांसाठी शहर लॉकडाऊन केले. 9 जुलैपर्यंत शहरात संचारबंदी राहणार आहे. फिरते दुध विक्रेते, परवानाधारक फळभाजी विक्रेते यांना परवानगी देण्यात आली आहे. शहरातील नागरीकांनीही स्वत:हून आपआपल्या घरात बसणे पसंत केले. शहरात आज कडेकोट संचारबंदी असल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासनानेही ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे
No comments:
Post a Comment