Thursday, July 9, 2020

गेवराई शहरात पोलिस आणि.नगर. परिषद .च्या वतीने संयुक्त कारवाई.

विना मास्क ५०० रुपये दंड तर सडकफिर्‍यांना दंडुक्याचा प्रसाद.

गेवराई (प्रतिनीधी );- काल पुन्हा गेवराई शहरासह तालुक्यातील केकत पांगरी येथे कोरोनाचे रुग्ण रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने शहरात आज ठिकठिकाणच्या चौकात कडक सुरक्षा मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे यासह शहरात विनाकारण फिरणार्‍यांना चाप बसवण्यासाठी पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद तर विना मास्क बाबत नगर परिषदेच्या वतीने ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.     गेवराई शहरातील इस्लामपुरा भागात  गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यामुळे शहरातील इस्लामपुरा,सावता नगर,संजयनगर हे भाग सील करण्यात आले होते. परंतु भागात वाहतुकीची वर्दळ सुरूच होती. यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी या भागातील ७ दुकानावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करूनही काहीच परिणाम दिसून आला नाही. दरम्यान काल पुन्हा शहरातील इस्लामपुरा व तालुक्यातील केकत पांगरी या ठिकाणी असे दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागे झाले व आज शहरातील चौकाचौकात नाके बंदी करून कारवाई सुरू केली. यामध्ये नगर परिषदेच्या वतीने विना मास्क वाल्यांना ५०० रु. दंड तर विनाकारण गाडीवर फिणार्‍यांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद दिला जात असल्याने पोलीस दिसताच नागरिक पळ काढू लागले आहेत. या कारवाईसाठी तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्यासह पोलीस प्रशासनासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड,पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप काळे व पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड यांची दोन पथके तयार करण्यात आली असून ही कारवाई मोहीम दिवसभर जोरात चालू आहे. यामध्ये सपोनि संदीप काळे व मनीषा जोगदंड यांच्यासह एएसआय सुनील ऐटवार,पो.हे.कॉ.देशमुख,रणजित पवार,अंकुश वरपे,पो.कॉ.तागड, अमोल खटाने,नितीन राठोड यांच्यासह आदीचा या पथकात समावेश आहे. तर नगर परिषदेच्या पथकात दिलीप निकम,कैलास सुतार,दिलीप वडमारे यांचा समावेश आहे. या संयुक्त कारवाईत दुपारपर्यंत जवळपास अंदाजे ८ ते १० हजार रुपयाची दंड वसुली करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आली.

No comments:

Post a Comment