Sunday, July 5, 2020

परळी शहरात 5 रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह. आपण घाबरु नये.प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत त्यांना सहकार्य करावे--सौ.वर्षा मगर


परळी वैजनाथ ;--परळी शहरात शनिवारच्या चाचणी मध्ये 5 रुग्ण पॉझीटिव्ह आलेले आहेत,पण आपण घाबरु नये.जिल्हाचे जिल्हधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तहशील प्रशासन,पोलीस प्रशासन,नगर परिषद प्रशासन,वैद्यकीय प्रशासन व त्यांचे सहकारी  परळीची परिस्थिती अंत्यत काळजी पुर्वक हाताळत आहेत.
आपण तूर्त SBI टॉवर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या जे जे नागरिक संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून प्रशासनास कळावावे व पुढील आवश्यक तपासण्या गरज असल्यास कराव्यात .आता आपल्याला परळी शहरात सुद्धा गरज आहे स्वतःहून स्वयंप्रेरणेने पुढील काही दिवस लॉकडाउन करण्याची.. बाकी हा आजार रोग प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्यांना घातक आहे .आपली रोग प्रतिकार वाढवा .तसेच मधुमेह,रक्तदाब,दमा, वृद्ध,लहान मूल यांची अधिक काळजी घ्या असे आवाहान कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा हनुमंत मगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment