* १० जागांसाठी ५०० पेक्षा अधिक उमेदवार मुलाखतीला, ही आहे बेरोजगारीची वस्तूस्थिती .
बीड (प्रतिनीधी )- कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिल्याने बेरोजगारीचा भस्मासूर आता प्रत्येकाच्या मानगुटीवर बसत असल्याचे चित्र समोर येत असून जिल्हा रुग्णालयात कोविड वार्डामध्ये १० कक्ष सेवकांची भरती करण्याची माहिती समोर येताच बीड जिल्ह्यातील हजारो तरुणांनी अक्षरश: या मरणाच्या दारात नोकरी करण्याच्या इराद्याने अर्ज केले. आज प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा रुग्णालयात तब्बल सातशेपेक्षा अधिक उमेदवार उपस्थित राहिल्यानंतर नोकरी कुठलीही असो, मग ती कंत्राटी किवा साक्षात यमाच्या दारात असो, परंतु नोकरी घरात पाहिजे, ही भूमिका बेरोजगारीचीव वस्तूस्थिती समोर मांडत आहे.
सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्येही अनेक रुग्ण आढळून आले. दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात कक्ष सेव भरती केली जात आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. १० जागा भरावयाच्या असल्याने त्यासाठी ५०० पेक्षा जास्त अर्ज आले. आज सकाळपासून डॉ. अशोक थोरात, डॉ. राऊत, बोबडे मॅडम सह आदी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. कोविड वार्डात जागा निघाल्या असल्या तरी या ठिकाणी नोकरी करण्यासाठी शेकडो तरुण मुलाखतीसाठी हजर झाले होते. ही नोकरी कंत्राट पद्धतीची असून ती फक्त तीन महिन्यांसाठीच आहे. दरमहिना १२ हजार रुपये नुसार संबंधितांना पगार मिळणार आहे, असे असतानाही बेरोजगारांची गर्दी या नोकरीसाठी दिसून आली.
No comments:
Post a Comment